×
In

पुणे – भिगवणच्या तरुणीचा व्हिडिओ समोर, अपहरण नाट्यात मोठा ट्विस्ट
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, याप्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून मुलीने स्वत: व्हिडिओ बनवून याबाबत माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याने या घटनेत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. भिगवणमधून मुलीचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी याबाबत सविस्तरपणे माहिती दिली, त्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघेही फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात होते. त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित झाला होता. त्यातच, आता तरुणीने स्वत: व्हिडिओ बनवून माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले. माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे, अशी माहिती मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून दिली. दरम्यान, मुलीकडून व्हिडिओ आल्यानंतर पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप यश आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

raziqueshaikh267@gmail.com

संघर्ष नायक - सच की आवाज़ ​नमस्ते, संघर्ष नायक (Sangharsh Nayak) में आपका स्वागत है। ​हमारा उद्देश्य समाज की महत्वपूर्ण खबरों, राजनीति, जीवनशैली, तकनीक और जनहित के मुद्दों को आप तक ईमानदारी और निष्पक्षता के साथ पहुँचाना है। आज के डिजिटल युग में जहाँ खबरों की भरमार है, हमारा प्रयास है कि हम आपको केवल वही जानकारी दें जो आपके लिए उपयोगी और सत्य हो। ​हम कवर करते हैं ? *साथ ही हमारा साप्ताहिक संघर्ष नायक हिंदी मराठी अख़बार आप इस माध्यम से पढ़ पाओगे* ​राजनीति (Politics): स्थानीय और राष्ट्रीय स्तर की राजनीतिक हलचल। ​शिक्षा और रोजगार: युवाओं के लिए काम की खबरें। ​समाज और कल्याण (Social & Wellness): समाज में बदलाव और आपके स्वास्थ्य से जुड़ी जानकारी। ​टेक्नोलॉजी: तकनीक की दुनिया में हो रहे बदलाव। ​ *हमारा लक्ष्य:* हमारा मानना है कि जानकारी ही शक्ति है। संघर्ष नायक के माध्यम से हम आम जनता की आवाज़ को मंच देना चाहते हैं और एक जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान देना चाहते हैं। ​अगर आपके पास हमारे लिए कोई सुझाव है या आप कोई जानकारी साझा करना चाहते हैं, तो आप हमसे : [ raziqueshaikh257@gmail.com ] [ sangharshnayak267@gmail.com ] पर संपर्क कर सकते हैं।

Related Posts

सगी बहन की हत्या करने वाले भाई को उम्रकैद, बुलढाणा कोर्ट का बड़ा फैसला

बुलढाणा: महाराष्ट्र के बुलढाणा जिला न्यायालय ने अपनी सगी बहन की बेरहमी से हत्या करने वाले आरोपी भाई को दोषी करार देते...

Read out all

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध

चिखली  : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय...

Read out all

घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत द्या — भाई विजयकांत गवई यांची मागणी

चिखली प्रतिनिधि:- तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून...

Read out all

चिखलीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई; दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार

चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे,...

Read out all

रूस–यूक्रेन युद्ध 2026: भीषण हमलों के बीच शांति की उम्मीद धुंधली

कीव/मॉस्को, 3 जून 2026। रूस और यूक्रेन के बीच जारी युद्ध एक बार फिर खतरनाक मोड़ पर पहुंच गया है। पिछले कुछ...

Read out all

खामगाव NDPS प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी; पत्रकार मोहम्मद तोसिफ यांचा गंभीर आरोप

खामगाव, प्रतिनिधी : खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणात आपला भाऊ मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर...

Read out all