- 0
- 23 words
चिखली प्रतिनिधि:- तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार साहेब यांना निवेदन 12 जून रोजी देण्यात आले, चिखली तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर विविध घरकुल योजनांचे अनेक लाभार्थी घरबांधणीचे काम करीत आहे शासनाने लोकहिताचा विचार करून घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मात्र सदर निर्णयाची चिखली तालुक्यात महसूल विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे शासनाच्या या लोककल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे चिखली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना इतर घरकुल योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना येत्या 15 ते 20 दिवसाच्या आत शासन निर्णयानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात व त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी होत नसल्याने व घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश सचिव भाई विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा नेते सलीम भाई, सतीश पवार, दीपक तायडे, विशाल काकडे होते.

