वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
मलकापूर:
“अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या वेदना न बोलता, बाबासाहेबांच्या विचारांची मशाल अखंड पेटती ठेवण्याचे महान कार्य माता रमाई यांनी केले. त्या केवळ बाबासाहेबांच्या जीवनसंगिनी नव्हत्या, तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची निःशब्द प्रेरणा, संघर्षाची ऊर्जा आणि माणुसकीचा जिवंत आदर्श होत्या. त्यांच्या संयम, समर्पण आणि त्यागामुळेच सामाजिक न्यायाची चळवळ अधिक भक्कम झाली,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी केले.
स्थानिक रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने आयोजित ‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर’ यांच्या जयंती कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितचे तालुकाध्यक्ष विजय झनके हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस.एस. वले, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत कळासे, जिल्हा सचिव तुळशीराम वाघ, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, तालुका महासचिव गणेश सावळे, धम्मपाल उमाळे, यासीनभाई कुरेशी, राजू शेगोकार, एम.ओ. सरकटे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य
माता रमाई यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांचा संघर्ष आजही आपल्याला माणूस म्हणून अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनवतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते
याप्रसंगी दिलीप वाघ, मधुकर निकम, महिला तालुकाध्यक्षा पौर्णिमा इंगळे, दीपमाला इंगळे, रमेश गोरे, नरसिंग चव्हाण, गजानन झणके, इलियास काझी, कडू धुरंदर, बाबुराव वानखेडे, गौतम तायडे, अजय वानखेडे, सुपडा धुरंदर, मोहन गवई, विमलाकर ठाकरे, निनाजी झणके, सुनील वानखेडे, किशोर मोरे, विनोद इंगळे, संजय झनके, चंद्रभान झनके, संघपाल तायडे, यशवंत इंगळे, गौतम गुरचळ, संजय मोरे, सुपडा इंगळे, गौतम गवई, अजय निकम, रमा होडघरे, वैशाली प्रधान, मंदा इंगळे, लता वानखेडे, सरला थाटे, इंदुबाई इंगळे, वनमाला अंदुरकर, उज्वला इंगळे, प्रतिभा अंदुरकर, रंजना इंगळे आदींसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.












Leave a Reply