sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

मराठी भाषा दिन

मी मराठी, माझी मायबोली मराठी
ज्ञानेशांची ओवी जिजाऊंच्या ओठी
शिवबांची खडग तळपे जशी रणांगणी
तशी तुकोबांची वाणी मराठीच्या अंगणी

माझ्या माय मराठीची गोडी लय न्यारी
महानुभव तत्वज्ञान मराठीच्या अंतरी
वारकरी संप्रदायाची मराठी ज्ञानवारी
सुफी संतांची मराठी, या मातीला उभारी

माझ्या माय मराठीचा देवनागिरी संसार
काना, वेलांटी, उकार,नवरसांचा दरबार
फुल्यांचा शिवाजी, दलित साहित्य झुंजार
साऊंचा काव्यफुले, बहिणाईचा काव्यसंसार

भारुड,गझल,भूपाळी,भुलाबाईचा जागर
करी माय मराठीला जगी अजरामर
कवी संमेलंने माय मराठीची गोडी
देश विकासात माय मराठी विकास नाडी

मराठी मती समृद्ध करती नियतकालिके
शेतशिवाराला हसविती लोकगीते
सह्याद्रीचा पहारा करी कवींना बोलके
माय मराठी अमृतातेही पैजा जिंके

वपु, पुलं,प्रके, प्रई,अण्णा, शिरवाडकर
नेती माय मराठीची गोडी सातासमुद्रापार
शाहिरांचा पोवाडा,लावणीचा शृंगार
करती माय मराठीची साहित्य सेवा अपरंपार

माझ्या मराठी ने घ्यावी उंच उंच भरारी
तिला लाभावी प्रतिष्ठा कवी कलशापरी
मराठी शाळा व खडू-फळा संस्कार शिदोरी
नको उपेक्षा माय मराठीची आपुल्याच घरी

हि .रा‌. गवई ( पर्यवेक्षक )
श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला
73 87 65 15 14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *