×

मौजे उत्रादा, तालुका चिखली येथील जलजिवन योजने अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे नित्कृष्ट कामाबाबतची चौकशी करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु

चिखली प्रतिनिधी:- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उत्रादा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली मार्फत उत्रादा गावाजवळ असलेल्या खोऱ्यातील धरणामध्ये उत्रादा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचे बांधकाम हे अत्यंत कमी खोलीचे घेण्यात आलेले असून तेथून गावात येणारी पाईप लाईन चे खोदकाम तसेच पाईपाची जुळवणी यामध्ये तफावत असून थातुरमातुर जोडण्यात आलेली आहे.
तसेच ५० हजार लिटरची क्षमता असलेला १२ मी. उंच जलकुंभ सिमेंट काँक्रीटद्वारे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी व त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकून तपासणी केली असता प्रथमतःच पाणी टाकल्यावर सदर पाण्याची टाकी ही झिरपु लागली व त्यातून पाण्याची गळती झाली. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतरची गळती होत असतांना गावातील प्रतिष्ठीत व पत्रकार हजर होते. त्यांचे समक्ष पाणी गळती झाली यावरुन या पाण्याच्या टाकीचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे यामध्ये वापरण्यात आलेली रेती, वाळू, गिट्टी, लोहा इत्यादी बांधकामासाठी लागणारे साहित्याची मात्रा ही कोटेशन मध्ये दिलेल्या अटी व नियमाप्रमाणे आहे किंवा कसे याची चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आज रोजी पाण्याची टाकी जर गळत असेल तर त्यामध्ये संपूर्ण पाणी भरल्यानंतर पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ती पाण्याची टाकी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नसून त्याखाली उत्रादा गावातील महिलांचा व लोकांचा व लहान मुलांचा जिव जाण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास यास केवळ संबंधीत अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदार राहतील. या जलकुंभाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम तसेच विहीरीचे संपूर्ण खोलीकरणाचे काम याची क्वॉलीटी कंट्रोल बांधकाम मंडळ अकोला यांचे मार्फत वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करुन त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात यावे. तसेच प्रत्येक गावकऱ्याच्या घरासमोर पाईप लाईनचे कनेक्शन आणुन सोडलेले आहे ते काम अर्धवट सोडलेले आहे. तसेच पाईपलाईनच्या विहीरीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपाच्या व्यासाची मि.मी. लांबी रुंदीची चौकशी करण्यात यावी. तरी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित कामात दोषी आढळल्यास ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून त्याचे संपूर्ण बिल रोखण्यात यावे कारण बिल दिल्यावर ठेकेदार पळून गेल्यावर यदाकदाचीत पाण्याची टाकी पडल्यावर यास जबाबदार कोण? त्यासाठी तक्रारकर्त्याच्या नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तेव्हाच बिल काढावे असे न झाल्यास उपरोक्त कामाची चौकशी न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही न झाल्यास आम्ही आमरण उपोषण सुरूचं ठेवू. यामुळे आमच्या जीवितास धोका झाल्यास तसेच होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबदारी ठेकेदाराची व संबंधित अधिकाऱ्याची राहील याची शासनाने नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

raziqueshaikh267@gmail.com

संघर्ष नायक - सच की आवाज़ ​नमस्ते, संघर्ष नायक (Sangharsh Nayak) में आपका स्वागत है। ​हमारा उद्देश्य समाज की महत्वपूर्ण खबरों, राजनीति, जीवनशैली, तकनीक और जनहित के मुद्दों को आप तक ईमानदारी और निष्पक्षता के साथ पहुँचाना है। आज के डिजिटल युग में जहाँ खबरों की भरमार है, हमारा प्रयास है कि हम आपको केवल वही जानकारी दें जो आपके लिए उपयोगी और सत्य हो। ​हम कवर करते हैं ? *साथ ही हमारा साप्ताहिक संघर्ष नायक हिंदी मराठी अख़बार आप इस माध्यम से पढ़ पाओगे* ​राजनीति (Politics): स्थानीय और राष्ट्रीय स्तर की राजनीतिक हलचल। ​शिक्षा और रोजगार: युवाओं के लिए काम की खबरें। ​समाज और कल्याण (Social & Wellness): समाज में बदलाव और आपके स्वास्थ्य से जुड़ी जानकारी। ​टेक्नोलॉजी: तकनीक की दुनिया में हो रहे बदलाव। ​ *हमारा लक्ष्य:* हमारा मानना है कि जानकारी ही शक्ति है। संघर्ष नायक के माध्यम से हम आम जनता की आवाज़ को मंच देना चाहते हैं और एक जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान देना चाहते हैं। ​अगर आपके पास हमारे लिए कोई सुझाव है या आप कोई जानकारी साझा करना चाहते हैं, तो आप हमसे : [ raziqueshaikh257@gmail.com ] [ sangharshnayak267@gmail.com ] पर संपर्क कर सकते हैं।

Related Posts

सगी बहन की हत्या करने वाले भाई को उम्रकैद, बुलढाणा कोर्ट का बड़ा फैसला

बुलढाणा: महाराष्ट्र के बुलढाणा जिला न्यायालय ने अपनी सगी बहन की बेरहमी से हत्या करने वाले आरोपी भाई को दोषी करार देते...

Read out all

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध

चिखली  : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय...

Read out all

घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत द्या — भाई विजयकांत गवई यांची मागणी

चिखली प्रतिनिधि:- तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून...

Read out all

चिखलीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई; दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार

चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे,...

Read out all

रूस–यूक्रेन युद्ध 2026: भीषण हमलों के बीच शांति की उम्मीद धुंधली

कीव/मॉस्को, 3 जून 2026। रूस और यूक्रेन के बीच जारी युद्ध एक बार फिर खतरनाक मोड़ पर पहुंच गया है। पिछले कुछ...

Read out all