sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला धोका

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला धोका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडले आहेत. या युद्धाचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता असून, यामुळे देशात महागाई वाढू शकते, असा गंभीर इशारा प्रसिद्ध रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ ने दिला आहे. इंधन आयातीवर मोठा परिणामभारताच्या एकूण इंधन गरजेपैकी तब्बल ४६ टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू (LNG) हा मध्य पूर्वेतील देशांमधून आयात केला जातो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी मार्गावर अडथळे निर्माण झाले आहेत. जर हा पुरवठा विस्कळीत झाला किंवा थांबला, तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल, असे मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.रुपयावर वाढणार दबावइंधन महाग झाल्यामुळे भारताला आयातीसाठी अधिक अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागतील. याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होईल आणि रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो. तसेच, देशाच्या चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.सामान्यांच्या खिशाला बसणार झळकच्चे तेल महाग झाल्यास देशांतर्गत वाहतूक खर्च वाढेल. परिणामी, अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढून महागाईचा भडका उडू शकतो. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारला विशेष आर्थिक धोरणे राबवावी लागतील, जे वित्तीय व्यवस्थापनासाठी आव्हानात्मक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *