×

छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणीच्या सावत्र आई-वडिलांनी, “मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होतो,” अशी माहिती दिली. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसलं. सामान भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गाधीमध्ये गुंडाळून ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले. पण गादी पाहिली असता त्यात कुणीतरी गुंडाळल्याचे त्यांना आढळून आले. त्यात 20 वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावून गेले.
मुलीचे अफेअर होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईचे म्हणणे आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्र आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

raziqueshaikh267@gmail.com

संघर्ष नायक - सच की आवाज़ ​नमस्ते, संघर्ष नायक (Sangharsh Nayak) में आपका स्वागत है। ​हमारा उद्देश्य समाज की महत्वपूर्ण खबरों, राजनीति, जीवनशैली, तकनीक और जनहित के मुद्दों को आप तक ईमानदारी और निष्पक्षता के साथ पहुँचाना है। आज के डिजिटल युग में जहाँ खबरों की भरमार है, हमारा प्रयास है कि हम आपको केवल वही जानकारी दें जो आपके लिए उपयोगी और सत्य हो। ​हम कवर करते हैं ? *साथ ही हमारा साप्ताहिक संघर्ष नायक हिंदी मराठी अख़बार आप इस माध्यम से पढ़ पाओगे* ​राजनीति (Politics): स्थानीय और राष्ट्रीय स्तर की राजनीतिक हलचल। ​शिक्षा और रोजगार: युवाओं के लिए काम की खबरें। ​समाज और कल्याण (Social & Wellness): समाज में बदलाव और आपके स्वास्थ्य से जुड़ी जानकारी। ​टेक्नोलॉजी: तकनीक की दुनिया में हो रहे बदलाव। ​ *हमारा लक्ष्य:* हमारा मानना है कि जानकारी ही शक्ति है। संघर्ष नायक के माध्यम से हम आम जनता की आवाज़ को मंच देना चाहते हैं और एक जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान देना चाहते हैं। ​अगर आपके पास हमारे लिए कोई सुझाव है या आप कोई जानकारी साझा करना चाहते हैं, तो आप हमसे : [ raziqueshaikh257@gmail.com ] [ sangharshnayak267@gmail.com ] पर संपर्क कर सकते हैं।

Related Posts

सगी बहन की हत्या करने वाले भाई को उम्रकैद, बुलढाणा कोर्ट का बड़ा फैसला

बुलढाणा: महाराष्ट्र के बुलढाणा जिला न्यायालय ने अपनी सगी बहन की बेरहमी से हत्या करने वाले आरोपी भाई को दोषी करार देते...

Read out all

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध

चिखली  : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय...

Read out all

चिखलीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई; दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार

चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे,...

Read out all

रूस–यूक्रेन युद्ध 2026: भीषण हमलों के बीच शांति की उम्मीद धुंधली

कीव/मॉस्को, 3 जून 2026। रूस और यूक्रेन के बीच जारी युद्ध एक बार फिर खतरनाक मोड़ पर पहुंच गया है। पिछले कुछ...

Read out all

खामगाव NDPS प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी; पत्रकार मोहम्मद तोसिफ यांचा गंभीर आरोप

खामगाव, प्रतिनिधी : खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणात आपला भाऊ मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर...

Read out all