×

गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चिखलीतील जयस्तंभ चौक येथे दर्शन; खडकपूर्णा धरणात विसर्जन

चिखली : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपल्या ठसठशीत नेतृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाची श्रद्धांजलीपर बुलढाणा जिल्हा परिक्रमा मंगळवार, ३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, गुरुवार, ५ फेब्रुवारीपर्यंत ही परिक्रमा चालणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांना अस्थिकलश दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या परिक्रमेअंतर्गत गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, जयस्तंभ चौक येथे अस्थिकलश दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.अस्थिकलश दर्शनानंतर दुपारी ३ वाजता संत चोखामेळा सागर अर्थात खडकपूर्णा धरण प्रकल्प येथे पवित्र अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार असून, त्यानंतर या श्रद्धांजलीपर जिल्हा परिक्रमेची सांगता होणार आहे.स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या परिक्रमेदरम्यान त्यांच्या कार्याची आठवण काढत जनतेच्या भावना व्यक्त होणार आहेत. जिल्हाभरात शोकमय व भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.या अस्थिकलश दर्शनासाठी चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिखली तालुकाध्यक्ष संतोष परिहार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

raziqueshaikh267@gmail.com

संघर्ष नायक - सच की आवाज़ ​नमस्ते, संघर्ष नायक (Sangharsh Nayak) में आपका स्वागत है। ​हमारा उद्देश्य समाज की महत्वपूर्ण खबरों, राजनीति, जीवनशैली, तकनीक और जनहित के मुद्दों को आप तक ईमानदारी और निष्पक्षता के साथ पहुँचाना है। आज के डिजिटल युग में जहाँ खबरों की भरमार है, हमारा प्रयास है कि हम आपको केवल वही जानकारी दें जो आपके लिए उपयोगी और सत्य हो। ​हम कवर करते हैं ? *साथ ही हमारा साप्ताहिक संघर्ष नायक हिंदी मराठी अख़बार आप इस माध्यम से पढ़ पाओगे* ​राजनीति (Politics): स्थानीय और राष्ट्रीय स्तर की राजनीतिक हलचल। ​शिक्षा और रोजगार: युवाओं के लिए काम की खबरें। ​समाज और कल्याण (Social & Wellness): समाज में बदलाव और आपके स्वास्थ्य से जुड़ी जानकारी। ​टेक्नोलॉजी: तकनीक की दुनिया में हो रहे बदलाव। ​ *हमारा लक्ष्य:* हमारा मानना है कि जानकारी ही शक्ति है। संघर्ष नायक के माध्यम से हम आम जनता की आवाज़ को मंच देना चाहते हैं और एक जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान देना चाहते हैं। ​अगर आपके पास हमारे लिए कोई सुझाव है या आप कोई जानकारी साझा करना चाहते हैं, तो आप हमसे : [ raziqueshaikh257@gmail.com ] [ sangharshnayak267@gmail.com ] पर संपर्क कर सकते हैं।

Related Posts

सगी बहन की हत्या करने वाले भाई को उम्रकैद, बुलढाणा कोर्ट का बड़ा फैसला

बुलढाणा: महाराष्ट्र के बुलढाणा जिला न्यायालय ने अपनी सगी बहन की बेरहमी से हत्या करने वाले आरोपी भाई को दोषी करार देते...

Read out all

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध

चिखली  : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय...

Read out all

चिखलीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई; दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार

चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे,...

Read out all

रूस–यूक्रेन युद्ध 2026: भीषण हमलों के बीच शांति की उम्मीद धुंधली

कीव/मॉस्को, 3 जून 2026। रूस और यूक्रेन के बीच जारी युद्ध एक बार फिर खतरनाक मोड़ पर पहुंच गया है। पिछले कुछ...

Read out all

खामगाव NDPS प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी; पत्रकार मोहम्मद तोसिफ यांचा गंभीर आरोप

खामगाव, प्रतिनिधी : खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणात आपला भाऊ मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर...

Read out all