sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच विद्यार्थिनीवर केला बलात्कार

भोकरदन – शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावातील खाजगी गाडी चालकाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना भोकरदन ते नांजा रोडवर घडली आहे. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी भरत भीमराव मगरे वय ३२ याच्या मुसक्या आवळल्या आहेत.तालुक्यातील एका गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भोकरदनला येतात. बसची सोय नसल्याने गेल्या पाच-सहा वर्षांपासून भरत मगरे हा आपल्या गाडीतून या विद्यार्थ्यांना ने-आण करतो. २ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तो विद्यार्थ्यांना घेऊन निघाला. सर्वांना आपापल्या शाळेत सोडल्यानंतर, दहावीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला त्याने शाळेत न सोडता नांजा रोडवरील एका शेतात नेले. तिथे ओरडू नये म्हणून तोंड दाबून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी परतली आणि तिने आईला सर्व आपबिती सांगितली. आईने तात्काळ भोकरदन पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तत्काळ अटक केली. आरोपी भरत मगरे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तरीही त्याने अशा अघोरी कृत्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *