sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

विध्यार्थीने घेतली गळफास,चिठ्ठीत खळबळजनक मजकूर

जळगाव:- जळगाव शहरातील देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्यामुळे नैराश्यातून राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. काल ही घटना घडली. त्याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये प्राचार्यांनी मारहाण केल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. श्याम प्रभाकर पाटील ( वय १९ रा. बोदवड) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्यांविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे..जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम पाटील जळगावात देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात राहून शिक्षण घेत होता. तो जळगावात भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याचे रुममेट मित्र गावाला गेले असल्याने तो खोलीवर एकटाच होता. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूला महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांना जबाबदार धरले आहे.श्यामने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे की, “माझी कोणतीही चुकी नसताना प्राचार्यांनी मला सर्व शिक्षक स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत.” पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला उद्देशून, रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक, अशी भावपूर्ण विनंती देखील केली आहे.या घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. जोपर्यंत प्राचार्य योगेश पवार आणि संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका श्यामच्या पालकांनी घेतला होता. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याचे वडिल प्रभाकर पाटील यांनी त्यांचा मुलगा श्याम यांस प्राचार्य योगेश पवार यांनी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख करुन त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *