आगामी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आंबेडकरी कार्यकर्ता आणि जनतेला जयंती उत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रशासकीय लेव्हलला अनेक अडचणी निर्माण होतात ह्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जयंती शांतता मय वातावरणात डीजे मुक्त आणि शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन होणे 1) डीजे मुक्त जयंती 2)प्रबोधन कार्यक्रम 3)आजचा तरुण युवा आणि चळवळ 4)समजपुढील आव्हाने 5)जेथे 14एप्रिल ला परवानगी मिळत नाही त्यांना परवानगी
अशा व या सह निकष पूर्ण करणाऱ्या गावाचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करून तालुका स्तरीय बक्षीस देणे आवश्यक आहे. तरी जयंती उत्सवा दरम्यान होणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठीदेण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे यासाठी दि 29/3/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता स्थानिक विश्राम गृह चिखली येथे आपण आपलेच मार्गदर्शक म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना समवेत घेऊन जयंती उत्सव प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन बैठक आयोजित केली आहे तरी तालुकास्तरीय बैठकीला विचार विनिमय करण्यासाठी तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी हजर राहावे ही विनंती तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आली आहे












Leave a Reply